Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Department

Directorate of Vocational Education & Training, Maharashtra State

D. B. Patil, Govt. Industrial Training Institute, Belapur

आयटीआय बेलापूरमध्ये प्रवेश सत्र २०२५ च्या प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत समारंभ संपन्न ​

बेलापूर, १ सप्टेंबर २०२५ ​

दि. बा. पाटील, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Government ITI), बेलापूर येथे नवीन प्रवेश सत्र २०२५ निमित्त भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. विविध व्यवसायांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी ९.३० वाजता नीटनेटके गणवेश परिधान करून वेळेवर उपस्थित राहून या समारंभाला विशेष महत्त्व दिले.

स्वागत व विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन

समारंभाची सुरुवात संस्थेच्या गटनिदेशकांच्या मार्गदर्शनाने झाली. नवीन प्रशिक्षणार्थ्यांचे पुष्पगुच्छ व स्वागतपर भाषणाने उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

यावेळी विद्यार्थ्यांना केवळ संस्थेची माहिती देण्यात आली नाही तर –

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे समाजातील योगदान,

  • विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये कौशल्य शिक्षणाची भूमिका,

  • रोजगार व स्वयंपूर्ण उद्योजकतेच्या संधी,

  • On Job Training (OJT) चे महत्त्व

याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

या समारंभाला संस्थेचे गटनिदेशक श्री. किशोर सिरसाठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत शिल्प निदेशक श्री. राजकुमार राठोड, श्री. राजेंद्र ढाकणे, श्री. संजय राठोड, श्री. संतोष चव्हाण, सौ. स्वश्वती तंबाखे तसेच कनिष्ठ लिपिक श्री. सुभाष कांबळे सर उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी कौशल्य शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना शिस्त, मेहनत, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिकपणे शिकण्याची वृत्ती याबाबत मार्गदर्शन दिले.

प्रशिक्षण, परीक्षा पद्धती व गुणांकन

प्रत्येक शिल्प निदेशाकांनी आपापल्या व्यवसायाची (COPA, Turner, Wireman, Welder, Fitter, Plumber) माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यात –

  • प्रशिक्षणाची दैनंदिन पद्धत,

  • प्रात्यक्षिक व सैद्धांतिक ज्ञानाचे महत्त्व,

  • परीक्षा पद्धत व गुणांकन प्रणाली,

  • उद्योगाशी जोडलेले अभ्यासक्रम,

  • NCVT मानकांनुसार होणाऱ्या परीक्षा व प्रमाणपत्रांची माहिती

विद्यार्थ्यांना हे समजावून सांगण्यात आले की, आयटीआयमधील शिक्षण हे फक्त प्रमाणपत्रापुरते नसून आयुष्यभर उपयोगी पडणारे कौशल्य आहे.

प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती

प्रवेश सत्र २०२५ मध्ये विविध व्यवसायांमध्ये झालेल्या एकूण प्रवेशापैकी पहिल्याच दिवशी १५७ प्रशिक्षणार्थी उपस्थित राहिले. ही उपस्थिती विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे व आयटीआयबद्दल असलेल्या विश्वासाचे द्योतक असल्याचे गट निदेशकांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची मते व प्रतिक्रिया

कार्यक्रमाच्या शेवटी काही विद्यार्थ्यांनी आपली मते व्यक्त केली.

  • COPA व्यवसायातील विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांना संगणक क्षेत्रात करिअर घडवायचे आहे.

  • Fitter आणि Welder व्यवसायातील विद्यार्थ्यांनी “Make in India” मोहिमेत सहभागी होऊन औद्योगिक क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.

  • काही विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्याचा निर्धार व्यक्त केला.

बेलापूर आयटीआयचा प्रवेश सत्र २०२५ चा स्वागत समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. केवळ शिक्षणाची सुरुवातच नव्हे तर भविष्यातील रोजगार, उद्योग, उद्योजकता आणि कौशल्याधारित भारताच्या उभारणीचे स्वप्न या समारंभातून विद्यार्थ्यांना दिसले.

१५७ प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती ही केवळ आकडेवारी नाही तर कौशल्य शिक्षणावर समाजाचा वाढता विश्वास याचे प्रतीक आहे.

– संजय ल. राठोड (शि. नि. COPA)